Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»पिकांसह बांधकामाचे नुकसान झाल्यास प्रकल्प विभाग जबाबदार राहणार नाही
    कृषी

    पिकांसह बांधकामाचे नुकसान झाल्यास प्रकल्प विभाग जबाबदार राहणार नाही

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी दिल्या सूचना

    साईमत।यावल।प्रतिनिधी।

    जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पामध्ये ऑक्टोबर २०२४ पासून पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने शेळगाव प्रकल्प कार्यक्षेत्रातील संपादित केलेल्या जमिनीवरील पिकाचे अथवा बांधकामाचे नुकसान झाल्यास त्यास जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ हे जबाबदार राहणार नाही, अशी महत्त्वाची सूचना कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी दिली आहे.

    त्यांनी दिलेली माहिती अशी की, तापी नदीवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प, ता.जि.जळगाव प्रकल्पात ऑक्टोबर २०२४ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे. शेळगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी यावल (बोरावल बु. टाकरखेडा, वाघळुद, भोरटेक, अंजाळे, पिळोदा, पाडळसे, कठोरे प्र. सावदा) भुसावळ (जोगलखेडा, भानखेडे, साकेगाव, सतारे) व जळगाव (शेळगाव, तिघ्रे, कडगाव) तालुक्यातील १५ गावांच्या जमिनी संपादीत केलेल्या आहेत.

    पिक पेरणी अथवा अतिक्रमण करु नये

    संबंधितांना सुचित करण्यात येते की, संपादित केलेल्या जमिनीवर पिक पेरणी अथवा अतिक्रमण करु नये. तसेच ठिबक सिंचन संच, विद्युत मोटारी, तात्पुरते निवारे, गोठे आदी काढून घेण्यात यावे. शेळगाव प्रकल्पात पाणीसाठा केल्यानंतर संपादित जमिनीवरील पिकांचे अथवा बांधकामाचे नुकसान झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, त्याची नोंद घ्यावी, असे जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी कळविले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.