पाचोऱ्यात मनसेची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
येथील शासकीय विश्रामगृहात मनसेची जिल्हास्तरीय आढावा बैठक नुकतीच पार पडली. आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व विधानसभेनिमित्त कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले तसेच इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कारही केला. बैठकीत नगरदेवळा आणि तांदुळवाडी येथील काही तरुणांनी राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होवून जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
यांची लाभली उपस्थिती
यावेळी जिल्हा सचिव शुभम पाटील, उपजिल्हाध्यक्ष प्रज्ज्वल चव्हाण, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, भडगावचे तालुकाध्यक्ष सागर पाटील, पाचोरा शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, भडगावचे शहराध्यक्ष सुनील पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष निलेश मराठे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.