दोधे गावात वीज कोसळून पाच जण गंभीर जखमी

0
33

जखमींना तातडीने दाखल केले ग्रामीण रूग्णालयात

साईमत/रावेर/प्रतिनिधी :

तालुक्यातील दोधे गावात वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.

सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील दोधे गावात मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी वीज कोसळल्याने गावातील रहिवासी मीराबाई प्रताप जमरे (वय ३०), पूजा प्रताप जमरे (वय १३), रेखाबाई खरते (वय ३०), कालू खरते (वय ३०) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (वय ३२) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी आहेत. उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते.

प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक प्रशासनाने घटनेची दखल घेतली आहे. तसेच नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वीज पडलेल्या जखमींना रुणालयात दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, संदीप सावळे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here