Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»अंतर्नाद प्रतिष्ठानच्या कार्यशाळेत २४३ विद्यार्थ्यांनी शाडूमातीची साकारली गणेश मूर्ती
    भुसावळ

    अंतर्नाद प्रतिष्ठानच्या कार्यशाळेत २४३ विद्यार्थ्यांनी शाडूमातीची साकारली गणेश मूर्ती

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांना प्रेरित करण्याचा उद्देश

    साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :

    येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे रविवारी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत पहिली ते दहावी पर्यंतच्या २४३ विद्यार्थ्यांनी सहभाग होत शाडूमातीचे गणपती बनविले. प्रत्येक विद्यार्थ्याला अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे भिजविलेले मातीचे गोळे मोफत देण्यात आले होते. यंदा उपक्रमाचे चवथे वर्ष होते.

    कार्यशाळेचे उद्‍घाटन माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योजक श्याम दरगड यांच्या हस्ते गणपतीची आरती करून करण्यात आले.गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांची जाणीव ठेवून, शाडूमातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा हा उपक्रम होता. ‘शाडूमातीचा गणपती बनवू या, पर्यावरणाचे रक्षण करु या’ या संदेशाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.

    कार्यशाळेचा उद्देश

    गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचा वापर होतो. ज्यामुळे जलाशयांचे प्रदूषण वाढते. त्याच पार्श्वभूमीवर शाडूमातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तींचा प्रसार करणे आणि पर्यावरण रक्षणासाठी अधिक लोकांना प्रेरित करणे हाच कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

    प्रशिक्षण अन्‌ मार्गदर्शन

    कलाशिक्षक हितेंद्र नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनविण्याच्या कला आणि तंत्राची माहिती दिली. त्यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती तयार करताना शाडूमातीचा योग्य वापर कसा करावा, रंगसंगती कशी निवडावी आणि मूर्तीची रचना कशी साकारावी, त्याचे बारकावे शिकत गणेशाची मूर्ती साकारली.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे, समन्वयक उमेश फिरके, सह-समन्वयक विपिन वारके आणि उपक्रम समिती सदस्य ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, समाधान जाधव, राहुल भारंबे, राजेंद्र जावळे, देव सरकटे, राजू वारके, प्रा. श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, ललीत महाजन, सचिन पाटील, मंगेश भावे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

    विद्यार्थ्यांचा अनुभव

    कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंद आणि उत्साह व्यक्त केला. शाडूमातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचा हा त्यांचा अनुभव त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे वचन कार्यशाळेत दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.