विद्यार्थ्यांनी सादर केली देशभक्तीपर नृत्य, गीते
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कंजरभाट समाज युवा फाउंडेशन आणि प्रतिभा प्राथमिक, माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कंजरभाट समाज मंदिराच्या पटांगणावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रतिभा शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रतिभा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस. बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका नंदा पाटील, कंजरभाट समाजाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिभा माध्यमिक विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनींनी ‘मायभुमी’ देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच संगीतमय कवायत, पहिलीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाने दाद मिळवली.
यशस्वीतेसाठी कंजरभाट समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर, मोहन चव्हाण, फाउंडेशचे अध्यक्ष विजय अभंगे, उपाध्यक्ष सचिन बाटूंगे, सचिव राहुल नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, संतोष रायचंदे, नरेश बागडे, मोहन गारुंगे, योगेश बागडे, प्रदीप नेतलेकर, संदीप बागडे, जयेश माछरे, कार्तिक बाटूंगे, अनिल नेतलेकर, संदीप गारुंगे, पंकज गागडे, वीर दहियेकर, उमेश माछरे, मंगल गुमाने, राहुल दहियेकर, निलेश बागडे, नितीन बाटूंगे, संदीप अभंगे, गोपाल बाटूंगे, संतोष बागडे, सोनू रायचंदे, क्रांती बाटूंगे, गौतम बागडे, विजय बागडे, संतोष बागडे, महिला अध्यक्ष दीपमाला बाटूंगे, प्रतिभा प्राथमिक विद्यालयाच्या कुलकर्णी, संजय पाटील, मनीषा भिरुड, वैशाली चंदनकर, छाया पाटील, स्वाती भदाणे, शोभा बच्छाव, वैशाली पाटील, नफिसा तडवी, माया भालेराव, विश्वनाथ वाघ, सचिन चिते, गजानन सपकाळ, मनीषा पाटील, यशोदा गागडे, सुमित माछरे, गणेश बागडे, राज नेतलेकर यांच्यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नरेश बागडे तर आभार प्रतिभा शाळेचे श्री.सपकाळ यांनी मानले.
