Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेला सोयगावपासून प्रारंभ
    राजकीय

    महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेला सोयगावपासून प्रारंभ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सिल्लोड-सोयगावातून रंगनाथ काळे यांना उमेदवारी जाहीर करण्याची कार्यकर्त्यांनी घातली गळ

    साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

    महाविकास आघाडीच्या नुकत्याच सोयगावला झालेल्या संवाद यात्रा बैठकीत सिल्लोड-सोयगाव मतदार संघाची जागा कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यावी, असा निर्णय घेत सोयगावात महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी मिळाली तरी एकजुटीने काम करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक (शरद पवार गट) मूलचंद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. बैठकीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रंगनाथ काळे यांना सिल्लोड-सोयगाव मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्याची गळ घातली.

    लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सिल्लोड-सोयगावात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीची मूठ घट्ट केली आहे. त्यामुळे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक मूलचंद पवार यांच्या नेतृत्वाखाली संवाद यात्रा बैठक घेण्यात आली. बैठकीला काँग्रेसचे शांतीलाल अग्रवाल, ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार, उध्दव ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिलीप मचे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.इंद्रजित सोळुंके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष दिनेश हजारी, ज्येष्ठ नेते राजेंद्र अहिरे आदींची उपस्थिती होती.

    सिल्लोड-सोयगावची जागा मविआच्या ताब्यात येण्यासाठी घेतला एकमुखी निर्णय

    बैठकीत शिवसेना (उध्दव ठाकरे गट) तालुका प्रमुख दिलीप मचे, काँग्रेसचे भरत पगारे, राजू अहिरे, अजय नेरपगारे आदींनी सूचना उपस्थित केल्या होत्या. ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांनी येणाऱ्या काळात यापूर्वीच्या चुका बाजुला ठेवून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे. तसेच नवीन कार्यकर्त्यांना सोबत घ्या, अश्या सूचना दिल्या. संवाद यात्रेत महाविकास आघाडीची मूठ घट्ट करून कोणत्याही स्थितीत सिल्लोड-सोयगावची जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात येण्यासाठी एकमुखी निर्णय कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी घेतला.

    यांची होती उपस्थिती

    बैठकीला कृष्णा जुनघारे, दीपक देशमुख, राजू पाटील, चंदू काळे, भरत पगारे, सुधीर पठाडे, उबाठाचे शहराध्यक्ष रवींद्र काटोले, शरद दामोदर, योगेश महाकाळ, शेख शफीक, सुधाकर सोहनी, शेख निसार, अलीबाबा तडवी, राजू पाटील, काँग्रेसचे महिला आघाडीच्या विमल खैरनार, कमल पगारे आदींची उपस्थिती होती. आभार कृष्णा जुनघरे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’चे संकेत? भाजप मित्रपक्षांवरच डाव साधणार असल्याचा बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    April 12, 2026

    Sanjay Raut : राऊताचा दावा: शिंदे व अजित पवार गटाचे काही आमदार भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात

    April 3, 2026

    Rupali Chakankar : “भोंदूबाबा प्रकरणाचा मोठा धक्का; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब?”

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.