वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौक अवघ्या 40 दिवसात पूर्ण होणार

0
78

चौक सुशोभीकरण भूमिपूजनाने दुर्लक्षित असलेल्या चौकाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकाचे धुळे-मालेगाव रोड वाय पॉइंट येथे आ.किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आ.मंगेश चव्हाण यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तयार होणाऱ्या चौकामुळे विकसित चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष ठाणसिंग पाटील, उमा पाटील, विकास पाटील, भुरा पाटील, डॉ.राऊळ, मच्छुभाऊ राठोड, ए. ओ. पाटील, शैलेंद्र पाटील, आण्णा राजपूत, डॉ. सुनील राजपूत, डॉ. अनुप परमार, इंद्रसिंग राजपूत, आशालता चव्हाण, योगेश अग्रवाल, घृष्णेश्वर पाटील, संजू पाटील, नितीन पाटील, धर्मा वाघ, धनंजय मांडोळे, आप्पा मांडोळे, रवी पाटील, कपिल पाटील, आर.सी.पाटील, प्रितम रावलानी, श्रीनिवास खंडेलवाल, रामदास जाधव, भोजराज पुंशी शेठ, संजू राजपूत, सोमसिंग राजपूत, सरदार राजपूत, दशरथ पाटील, प्रशांत देशमुख, सदानंद चौधरी, आनंद खरात, अविनाश चौधरी, रावसाहेब साळुंखे, मुन्ना राजपूत, सुनील राजपूत, भगवान राजपूत, अरुणसिंग गुरुजी, सोनुसिंह ठाकरे, प्रशांत पाटील, रवी पाटील, माना राजपूत, अशोक राजपूत, निलेश राजपूत, बाबा पवार, बी.डी. पवार, विजू पवार, अभय राजपूत, राज संजयसिंग राजपूत, किरण देवरे, वैशाली राजपूत, वैशालीताई मोरे, विजया पवार, संगीता गवळी, अॅड. सुलभा पवार, सोनाली राजपूत, सविता राजपूत, अॅड. धनंजय ठोके, राहुल राजपूत, अॅड. राहुल राजपूत, अॅड. रणजीत पाटील, पियुष साळुंखे, काकासाहेब घोडे, विश्वजीत पाटील, किशोर पाटील, दीपक राजपूत, भोला राजपूत, अर्चना पाटील, टोनु राजपूत, सिद्धु राजपूत, नयन पाटील, प्रणव राजपूत, जे.बी. पवार, संग्राम शिंदे, गणेश राजपूत, अक्षय राजपूत, विशाल राजपूत, मधु गवारे, ललित कच्छवा, घनश्याम पाटील, सुनील ठोके, फकीरा मेंबर, भावडू पाटील, पप्पू वाणी, जितु वाघ यांच्यासह राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळ शक्ती ग्रुप, राणी पद्मावती ग्रुप, हिरकणी ग्रुप, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, राजपूत समाज बांधव उपस्थित होते.

शहराच्या लौकिकात पडणार भर

धुळे – मालेगाव रोड वाय पॉइंट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकाचे भूमिपूजन करत शहराच्या लौकिकात अजुन एक भर घातली आहे. काही दिवसांपूर्वी चौकाचे संकल्पचित्र सोशल मीडियावर शेअर करत याबाबत आनंदाची बातमी परिसरातील नागरिकांना दिली होती. बातमी भूमिपूजन करत सत्यात उतरविली आहे. वर्षानुवर्षे ज्या चौकाकडे दुर्लक्ष झाले. त्या चौकाकडे सर्व शहराचे लक्ष केंद्रित करण्याचे काम आ. चव्हाण यांच्या हस्ते झाले आहे. अवघ्या 40 दिवसात सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आ.चव्हाण यांनी सांगितले. आपल्या दूरदृष्टीने शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे आ.चव्हाण यांनी विकासाच्या बाबतीत नुसती बॅनरबाजी केली नाही तर विकासच असा करण्याचा प्रयत्न केला की,पाहिल्यावर आ.चव्हाण यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राजपूत समाजाने त्यांचे ऋण फेडावे

अडीच वर्ष विरोधात असल्याने त्यांना निधी मिळाला नाही. मात्र, अवघ्या दोन वर्षात सत्तेत आल्यानंतर शहराचा चेहरा बदलण्याचे काम आ.मंगेश चव्हाण यांनी केले आहे. वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकामुळे समाज ऋणी राहील, राजपूत समाजाच्या ज्या गावात दादा ‘मायनस’ होते. त्या गावात ‘प्लस’ करून समाजाने त्यांचे ऋण फेडावे, असे भडगाव-पाचोरा मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांनी सांगितले.

एक वर्षात अश्वारूढ पुतळा उभा करणार

पूर्वी भूमिपूजन व्हायचे, मात्र कामे होत नव्हती. MH 52 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी अशक्य वाटणारी कामे प्रत्यक्ष मार्गी लावता आली. भूमिपूजन करून अवघ्या 40 दिवसात वीरशिरोमणी हिंदूसुरू महाराणा प्रतापसिंह चौकाचे सुशोभीकरण पूर्ण करणार आहे. येत्या एक वर्षात याच ठिकाणी अश्वारूढ पुतळा उभा करणार आहे. केलेला कार्यक्रम हा वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या व समाजाच्या प्रती असलेली ही छोटीशी सेवा असून ती तालुक्याच्या चरणी अर्पण करतो, असे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here