Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»मध्यवर्ती प्रशासकीय २५ कोटींची भव्य इमारत रविवारपासून जनतेसाठी खुली होणार
    चाळीसगाव

    मध्यवर्ती प्रशासकीय २५ कोटींची भव्य इमारत रविवारपासून जनतेसाठी खुली होणार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश, आठ शासकीय विभाग एका छताखाली येणार

    साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :

    जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे प्रांत, तहसील व भूमी अभिलेख आदी महसूल विभागाचे कार्यालय चाळीसगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे. बहुतांश कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. किरकोळ कामांसाठी कार्यालयातून त्या कार्यालयात जाण्यासाठी पायपीट करावी लागते. ही कार्यालये शहराच्या रहदारीच्या ठिकाणी असल्याने वाहतुकीची कोंडी होणे यामुळे नागरिकांसह विविध शासकीय विभागांची गैरसोय होत होती. अशातच अनेक तालुक्यांना सर्व विभाग एकाच ठिकाणी असणारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असल्याने चाळीसगाव तालुक्यात ती असावी, अशी मागणी अनेक दशकांपासून होत होती. यासाठी आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दीड वर्षापूर्वी २५ कोटी रुपयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली होती. चाळीसगाव शहरातील शासकीय दूध डेअरी जवळील १५ हजार चौरस मीटर जागा यासाठी आरक्षित केली आहे. दोन मजले असणाऱ्या इमारतीत तळ मजल्यावर 1827 चौरस मीटर व पहिल्या मजल्यावर 1801 चौरस मीटर बांधकाम आहे.

    इमारत बांधकामासाठी २४ महिन्यांची मुदत होती. मात्र, आ.मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने केवळ १६ महिन्यात अश्या विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य अश्या इमारतीचे लोकार्पण ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दशकांचे चाळीसगाववासियांचे स्वप्न साकार झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव अशी मॉडेल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पहायला मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती रहावे, असे आवाहन आ.मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

    विकासयात्रेत मानाचा तुरा ठरणार : आ.मंगेश चव्हाण

    शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध, महिला, व्यापारी, उद्योजक आदी समाजातील सर्व घटकांचा दररोजचा संबंध शासकीय कार्यालयाशी येतो. मात्र, अगदी किरकोळ कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाण्यासाठी वेळ, पैसा, श्रम व्यर्थ जात होते. शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणावीत, अशी मागणी अनेक नागरिकांनी बोलून दाखविली होती. तालुक्याच्या विकासयात्रेत एक मानाचा तुरा ठरेल, असे काम करू शकलो. त्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव तालुक्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी दिली.

    आठ शासकीय कार्यालयात मिळणार अत्याधुनिक सुविधा

    २५ कोटी रुपये बहुचर्चित मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत चाळीसगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारी जवळपास आठ शासकीय विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होणार आहेत.

    शासकीय कार्यालयांसाठी १५ दालने

    प्रशासकीय सोयीसाठी अत्याधुनिक व वातानुकूलित सभागृह, संगणक व सर्वर कक्ष, सेतू सुविधा कक्ष, लोक अदालत कक्ष यात असणार आहेत. तसेच अधिकारी, कर्मचारी व शासकीय कामानिमित्त येणारे नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी अत्याधुनिक शौचालयासह स्वच्छतागृहे इमारतीत असणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Chalisgaon : शिवापूर शिवारात दुहेरी आत्महत्येची दुर्दैवी घटना

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.