Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»११ लाखांचा गांजा पकडला, एकास अटक
    क्राईम

    ११ लाखांचा गांजा पकडला, एकास अटक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अडावद पोलिसांची यशस्वी कामगिरी

    साईमत/ न्यूज नेटवर्क/ अडावद, ता.चोपडा:

    येथून जवळील विष्णापूर, ता.चोपडा येथील एका पत्रीशेडच्या घरावर छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. अडावद पोलिसांच्या धडक कारवाईने जिल्ह्याभरातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे. याबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

    सविस्तर असे की, विष्णापूर येथील सायसिंग बरकत बारेला (वय ३६) हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्रीशेडमध्ये अवैध गांजा बाळगत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने शनिवारी, २७ रोजी पहाटेच्या सुमारास चोपड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डाॅ.कुणाल सोनवणे, पो.नि. कावेरी कमलाकर, यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदचे स.पो.नि. संतोष चव्हाण, पो.उ.नि. राजु थोरात, पो.हे.काॅ. भरत नाईक, ज्ञानेश्वर सपकाळे, संजय धनगर, सतिष भोई, भूषण चव्हाण, जयसिंग राजपूत, मधुकर पवार यांच्या पथकाने छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. तसेच ६ हजार रुपये किंमतीचा ईलेक्ट्राँनिक वजन काटा, एक लाख रुपये किंमतीची मोटार सायकल यासह सायसिंग बारेला यास अटक केली आहे. पुढील तपास पो.हे.काँ. अनवर तडवी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.