Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»न्याय न मिळालेल्या मातेसह शिवसैनिकांकडून ठाणेदाराची आरती ओवाळण्याचा प्रयत्न
    क्राईम

    न्याय न मिळालेल्या मातेसह शिवसैनिकांकडून ठाणेदाराची आरती ओवाळण्याचा प्रयत्न

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

    वैद्यकीय व्यवसायात अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डॉ. राहुल चोपडे यांच्याविरुद्ध ३० मार्च २०२४ रोजी मुलाच्या चुकीचा उपचार केल्याने कायमचे आलेले अपंगत्व यासंदर्भात मेडिकल अपराध व मेडिकल बेजबाबदारपणा अशा आशयाच्या संदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार येथील पूनम भारंबे यांनी दिली होती. मात्र, तीन महिने उलटूनही मलकापूर पोलिसांनी कुठलीही एफआयआर नोंदवली नसल्याने अखेर २१ मे २०२४ रोजी सायंकाळी पीडित मातेने शिवसैनिकांनासह पोलीस स्टेशनला जाऊन ठाणेदारांना हार, फुले घालून आरती ओवाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पूनम भारंबे यांचा १६ वर्षीय मुलगा दुर्गेश भारंबे त्याच्या डाव्या पायातील टोंगळ्याच्या वाटीचे फॅक्चर उपचार अनुषंगाने मांडीपासून तळपायापर्यंत पक्के प्लास्टर केले. यानंतर दुर्गेश सलग दोन दिवस मरण यातना सहन करत होता. अवघ्या दोन दिवसात त्याचा पाय संवेदनहिन झाला. घाबरून आई-वडिलांनी बुऱ्हाणपूर येथील डॉ. सुबोध बोरले यांच्याकडे उपचार केल्यावर मातेला कळाले की, चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे मुलाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

    तदनंतर डॉ.राहुल चोपडे यांच्याविरुद्ध मेडिकल बेजबाबदारपणा व मेडिकल अपराध या आशयाने ३० मार्च २०२४ रोजी मलकापूर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिली. मात्र, गत तीन महिन्यांपासून आजतागायत मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांनी तक्रारीनंतर एफआयआर नोंदणीचे कर्तव्य पार पाडले नाही. त्यामुळे माझा संविधनिक कायदेशीर अधिकार डावल्याचा आरोप करीत पीडित दुर्गेशची आई पूनम भारंबे यांनी मवाळ लोकशाही आंदोलनाच्या पद्धतीतून शिवसैनिकांसमवेत जाऊन मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांची आरती देण्याचा बेत आखून त्या चक्क ठाणेदाराच्या केबिनमध्ये पोहोचल्या.

    साहजिकच ठाणेदार हरबळले, किंतू, परंतु केले. आरती ओवाळण्यास नकार देत धाकद पतशहा केला. नंतर दोन दिवसात प्रकरण कारवाईस लावतो, असे म्हणून पीडित मातेला आश्‍वासन देऊन प्रकरण शांत केले. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास मी मुलांसह पोलीस स्टेशनच्या आवारात उपोषणाला बसेल. त्यामुळे होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असे पीडित मुलाची माता पूनम भारंबे यांनी सांगितले. यावेळी दीपक चांभारे पाटील मलकापूर तालुकाप्रमुख, रोहन सागडे, युवासेना शहर प्रमुख, राजेंद्र काजळे, शिवसेना विभाग प्रमुख, तुषार पानट, युवासेना शहर उपप्रमुख, राणेताई, पत्रकार उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ आंबेडकर नगरात जुन्या वादातून तरूणावर मारहाण

    March 4, 2026

    Jalgaon : जळगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद मुलीचा शोध सुरू

    March 4, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी दोन जखमी

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.