गरजू रुग्णाला ओम शांती सेवा समितीने दिला मदतीचा हात

0
39

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

एक गरजू रुग्ण सलग चार दिवसांपासून पैसे नसल्याने दवाखान्यात फिरत आहे. कोणी मदत करत नसल्याने ओम शांती सेवा समितीने मदतीचा हात देऊन रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करीत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्या रुग्णाला ओम शांती सेवा समितीच्या अंतर्गत सलग तीन दिवसापासून तीन बॉटल्या रक्त तसेच रुग्णाला पूर्णपणे १६ हजार ८०० रुपये सर्व सेवा मोफत औषधी मेडिकल व सर्व प्रकारच्या मोफत सेवा देण्यात आल्या आहेत.

रुग्णाला मलकापुरातील कोणत्याही दवाखान्यात व कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णाला घेतले नाही. कारण त्या रुग्णाकडे पूर्वीचे पैसे नसल्यामुळे तो परिवार दारोदारी चार दिवसांपासून भटकत होता. निवडणूक काळात खरोखर अशा रुग्णांचा वाली कोण? लोकप्रतिनिधी झोपलेत का? यापुढे गरजू रुग्णांच्या मदतीसाठी कोण धावणार? असे एक ना अनेक प्रश्‍न अनेकांकडून उपस्थित होत आहे.

ओम शांती सेवा समितीकडे हा रुग्ण आल्यानंतर कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता रुग्णाला सरळ हाताने सर्व प्रकारच्या मोफत सुविधा कोणत्याही जातीभेदला बाजूला ठेवून परिवाराला संपूर्ण मदत करण्यात आली. तसेच म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’ त्यांच्या मदतीसाठी धावून येणारे ओम शांती सेवा समितीचे सेवाभावी एम.डी मेडिसिन डॉ. युसुफखान हे त्या गरजू रुग्णावर मोफत उपचार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here