साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून घरूनच मतदान करण्याची सुविधा यंदापासून दिली आहे. अशातच जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वात ज्येष्ठ मतदार श्रीमती लिलाबाई शिवराम धनराळे यांनी अमळनेर तालुक्यातील सर्वात पहिला मतदार म्हणून शनिवारी, ४ मे रोजी घरून मतदानाचा हक्क बजावला आहे.