Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»महसुलच्या अधिकाऱ्यांना न जुमानता अवैध गौण खनिज उत्खनन अन्‌ वाहतूक
    क्राईम

    महसुलच्या अधिकाऱ्यांना न जुमानता अवैध गौण खनिज उत्खनन अन्‌ वाहतूक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, यावल : प्रतिनिधी

    अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या नवीन पुलाखाली आणि जुन्या पुलाजवळ मंगळवारी, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर फैजपूर उपविभागीय पोलीस आयपीएस महिला अधिकारी अन्नपूर्णासिंग यांनी कारवाई करून एक जेसीबी, दोन डंपर, एक ट्रॅक्टर यावल पोलिसात जमा केले आहे. त्यामुळे महसूल विभागासह पोलीस दलात, अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

    यावल आणि अंजाळे मंडळात अवैध गौण खनिज उत्खनन आणि अवैध वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. अवैध व्यावसायिक संबंधित महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्यावर पाळत ठेवून अधिकारी, कर्मचारी शासकीय कोणत्या कामात, मीटिंगमध्ये व्यस्त आहे आणि राहणार आहेत. याचा अंदाज घेऊन अवैध गौण खनिज, अवैध वृक्षतोड करून सर्रासपणे वाहतूक करीत असतात याला काय म्हणावे?

    त्याचाच एक नमुना आज प्रत्यक्षात समोर आला आहे. यावल तहसील कार्यालयात आज यावल तहसीलदार यांनी पत्रकार परिषदेची आणि बीएलओ कर्मचाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. तहसीलदार आपल्या कामात व्यस्त असल्याचे निमित्त साधून अंजाळे येथील मोर नदी पुलाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या टोळीने आपला उद्योग सुरू केला असता फैजपूर पोलीस उपविभागीय आयपीएस महिला अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी अचानक घटनास्थळी धाव घेऊन अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्याच्या तयारीत असलेले एक जेसीबी, दोन डंपर, एक ट्रॅक्टर यावल पोस्टेला जमा केले. याबाबतची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी याबाबत सात जणांविरुद्ध अवैध गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. कारवाईमुळे महसूल पोलीस आणि गौण खनिज व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Titwala Crime News : अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनप्रकरणी क्रिकेट कोच अटकेत

    March 27, 2026

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Jalgaon : आव्हाणे रोडवर धाडसी चोरी; ‘नाईट किंग’ बारमधून विदेशी दारू लंपास

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.