Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शाखा प्रमुख व शिवसेनेच्या सरपंचांनी माझ गावं – माझी जबाबदारी मिशन मोडवर राबवा
    जळगाव

    शाखा प्रमुख व शिवसेनेच्या सरपंचांनी माझ गावं – माझी जबाबदारी मिशन मोडवर राबवा

    SaimatBy SaimatApril 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    मी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. राज्यात महायुतीचे सरकार जोमाने काम करीत आहे. जिल्ह्यातही महायुती एकदिलाने सोबत असून आमच्या शुध्द पाण्यात कुणीही खडा टाकून पाणी दूषित करू नये. पडद्याआड राजकारण करणार्‍या झारीतील शुक्राचार्यांपासून सावध रहा असा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना आज झालेल्या मेळाव्यात दिला. शिवसेनेचा मेळावा आज जळगाव येथे पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वक्त कम है जितना दम है लगा दो, कुछ लोगोंको मै जगाता हुँ, कुछ लोगों को तुम जगा दो अशा शब्दात शेर शायरी करत पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविला.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकांमध्ये युतीसाठी आम्ही नेहमीच शब्द पाळला आहे. यावेळी देखिल महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक लीड आमच्या मतदारसंघातून देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. शाखाप्रमुख, सरपंचांनी माझे गाव, माझी जबाबदारी या पध्दतीने मिशनमोडवर राहून काम करावे. मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून लोकसभेनंतर आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहनही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण याचा विचार न करता नियोजन करा. सुक्ष्म नियोजन करून विजयाची गुढी उभारा असे आवाहनही ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
    यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, युवासेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर काटोले, अजय महाजन, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका पदाधिकारी देविदास कोळी, जितू पाटील, डॉ कमलाकर पाटील, दूध संघाचे रमेश आप्पा पाटील, मार्केटचे माजी सभापती कैलास चौधरी, धोंडू जगताप, प्रमोद सोनवणे, राजू पाटील, प्रवीण परदेशी, संदीप सुरळकर, नगरसेवक ऍड. दिलीप पोकळे, सुरेश पाटील, ब्रिजलाल पाटील, राजू पाटील, साहेबराव वराडे, यांच्या सह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप सुरळकर यांनी केले तर आभार युवासेनेचे ज्ञानेश्वर कटोले यांनी मानले.

    101पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या घोषित

    शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेनेच्या तालुकास्तरीय 8 पदाधिकारी यांच्या नियुक्त्या घोषित करण्यात आली. तसेच सेवालाल महाराज अंगीकृत संघटनेच्या 16 पदाधिकाऱ्यांचा तसेच युवासेनेच्या 77 पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या घोषित करून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुके देवून केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव महापौरपदासाठी ‘लाडक्या बहिणींची’ नावे चर्चेत

    January 22, 2026

    Jalgaon : मालेगावजवळ माजी महापौर जयश्री महाजन यांच्या कारचा भीषण अपघात

    January 22, 2026

    Jalgaon : जळगावात ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरवर चोरी

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.