Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»धनादेश अनादर केल्याप्रकरणी ललित सोनार न्यायालयाकडून दोषी
    क्राईम

    धनादेश अनादर केल्याप्रकरणी ललित सोनार न्यायालयाकडून दोषी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 1, 2024Updated:April 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    सोने-चांदीच्या खरेदीपोटी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावून फिर्यादीस भरपाई म्हणून २० लाख रुपये देण्याचा आदेश दिला. ही रक्कम विहीत मुदतीत न्यायालयात जमा न केल्यास अधिकची सहा महिन्यांच्या कारावासाचीही शिक्षा सुनावली.

    सविस्तर असे की, येथील ललित अभय सोनार यांनी शहरातील सोने-चांदीचे व्यापारी मनोज सुभाषचंद जैन यांच्याकडून १७ लाख ५० हजारांच्या सोन्या-चांदीची खरेदी केली होती. त्याबदल्यात ललित सोनार यांनी मनोज जैन यांना धनादेश दिले होते. दिलेल्या तारखेला बँकेत धनादेश वटले गेले नाही. त्यामुळे मनोज जैन यांनी ललित सोनार यांच्या विरोधात येथील न्यायालयात खटला दाखल केला होता. ललित सोनार यांनी मनोज जैन यांना पाच लाख रुपये दिल्याचे न्यायालयाला सांगितले.

    ललित सोनार हे मनोज जैन यांना केवळ १२ लाख ५० हजार देण्यासाठी पात्र असल्याचा बचाव ललित सोनार केला होता. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर येथील न्यायालयाचे न्या.ए. एच. शेख यांनी ललित सोनार यांनी घेतलेला बचाव फेटाळून लावला व धनादेश अनादर प्रकरणी ललित सोनार यांना सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच ललित सोनार यांनी मनोज जैन यांना ३० दिवसांच्या आत २० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अदा करावे, असा निकाल देत ही रक्कम न दिल्यास ललित सोनार यांना आणखी सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. खटल्यात फिर्यादी मनोज जैन यांच्यातर्फे ॲड. समीर शेख आणि ॲड. अश्‍विनी चावरे यांनी कामकाज पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : दुचाकी पार्किंगच्या वादातून व्यापाऱ्यावर जमावाची बेदम मारहाण

    March 4, 2026

    Jalgaon:गोवंश तस्करीच्या संशयावरून जळगावात पहाटेचा राडा; वाहनांची तोडफोड, दोन तरुण जखमी

    March 4, 2026

    Jalgaon:आशाबाबा नगरात मध्यरात्रीची चोरी हॉटेल मॅनेजरच्या घरातून ४५ हजारांचा ऐवज लंपास

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.