साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील गायत्री शक्तीपीठ येथे वसंत पंचमीनिमित्त नुपूर कथ्थक डान्स ॲकॅडमीच्यावतीने ‘वसंतोत्सव’ शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी केले होते. सायंकाळी गायत्री मंत्र पठाणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला सरस्वती वंदना माहिता सुरी, शांभवी निनावे, नुपूर भालेराव, भार्गवी उंबरकर यांनी सादर करून वातावरण निर्मिती झाली.
कार्यक्रमात ‘राग बहार’मध्ये ‘आई रे आई ऋतु बसंत छाई’ यावर संजीवनी लाहोटी, सुनीता दरगड, मोक्षदा तळेले, अंजली ठाकूर यांनी नृत्य सादर केले. ‘बन्सीवालेने घेर लई’ गाण्यावर मानसी टेकवानी, पाही लद्धा, भूमिका भोसले, शार्वी लाहोटी, धनश्री भुरे, तेजस्वी पाटील यांनी सादरीकरण केले. यानंतर गायत्री वंदना गार्गी पुसतकर, यज्ञा पाटील, मानसी पवार, तनिष्का पाटील यांनी सादर केली. नुपूर भालेराव हिने तरणा सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘आई ऋतु बसंत’वर हेमांगी पंडागरे, नम्रता सराफ, लतिका श्रीखंडे, भावना कांबळे यांनी नृत्य सादर केले. नंतर ‘ऋतु बसंत’ गाण्यावर नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांनी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.
कथ्थक तीन तालमध्ये हेमांगी पंडागरे, लतिका श्रीखंडे यांनी नृत्य सादर केले. यानंतर ‘अधरम मधुरम’ गीतावर मानसी भवते हिने सादरीकरण केले. लतिका श्रीखंडे हिने ‘तराना’ सादर केला.कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व कलावंतांनी एकत्रितपणे गायत्री मंत्रावर नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळविली. कार्यक्रमास रसिकांच्या उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वीतेसाठी किरण फालक, रमाकांत भालेराव, राजेंद्र जावळे, रजनीश परिव्राजक, सविताताई, साक्षी, सुलभा नेहेते, गणेश सोनार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजश्री देशमुख तर आभार रमाकांत भालेराव यांनी मानले.
