Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»शहापूरातील शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
    पाचोरा

    शहापूरातील शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

    येथून जवळ असलेल्या शहापुरा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या. त्यात ३८ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात ‘बालविवाह’ नाटिकेत गावात घोड्यावर नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. बालविवाह दाखवून पोलिसांनी कशाप्रकारे नवरदेव, नवरी या सर्वांना अटक केलेले दाखविले. विविध नाटिका, देशभक्तीपर गीते, अंधश्रद्धापर नाटिका, भक्ती गीते अशा विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शहापुरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून म्हसासचे सरपंच तथा शहापुराचे सरपंच योगेश राजपूत, उपसरपंच सुनील राजपूत, ईश्‍वर परदेशी, विनोद परदेशी, राजूभाऊ परदेशी उपस्थित होते.

    कार्यक्रमात सादर केलेल्या विविध नृत्यांना व नाटिकांना उपस्थितांनी पंधरा हजार रुपयाचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. यावेळी कार्यक्रमाला वेगवेगळ्या मान्यवरांनी उपस्थिती दिली. यावेळी म्हसासचे मुख्याध्यापक ज्ञानेश्‍वर जाधव, कळमसरा शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पवार, कुंभार खान शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी, कासमपुरा शाळेचे मुख्याध्यापक डी.आर.पाटील, मनोहर पाटील, दिलीप चव्हाण, श्री.निकम, तुकाराम पाटील, श्री.तपोने, श्री.गायकवाड, किशोर पाटील, श्री.बोरसे, श्री.रोकडे आदी उपस्थित होते.

    यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी गावातील तरुण मित्र मंडळींनी तसेच सरपंच तथा उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शहापुरा गावातील नागरिक, पोलीस पाटील, केंद्रातील सर्व शिक्षकांनी मदत केली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रत्नाकर पाटील तर आभार शाळेचे उपशिक्षक रवींद्र पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Jalgaon : आर आर विद्यालयात गुढीपाडवा उत्सव: मराठी नववर्षाचे स्वागत ‘स्वररंग’ कार्यक्रमाने

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.