Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»यावल तालुक्यात उंच टेकड्याचे सपाटीकरण करून पिवळ्या मातीचा बेकायदा गोरखधंदा
    क्राईम

    यावल तालुक्यात उंच टेकड्याचे सपाटीकरण करून पिवळ्या मातीचा बेकायदा गोरखधंदा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, यावल : प्रतिनिधी

    यावलसह रावेर तालुक्यात राजकीय प्रभावामुळे पिवळी माती वाहतूक करताना ती पिवळी माती जादूने गाळ होत असल्याचे चर्चिले जात आहे. पिवळ्या मातीची वाहतूक करणारी वाहने यावल पोलीस, यावल तहसील कार्यालयाच्या समोरून बिनधास्तपणे सुसाट वेगाने धावत आहेत. त्यामुळे यावल तालुक्यात गाळ वाहतूकच्या नावाखाली उंच टेकड्याचे सपाटी करण करून पिवळ्या मातीचा बेकायदा गोरख धंदा सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर गौण खनिजाची लूट आणि शासनाच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम सुरु असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

    यावलसह रावेर तालुक्यात अनेक ठिकाणी खासगी उद्योग व्यवसायासाठी आणि बिनशेती जागांवर जेसीबी मशिनरीच्या सह्याने उंच टेकड्याचे सपाटीकरण करून त्या ठिकाणची पिवळी माती व्यावसायिक वापरासाठी वापरली जात आहे. प्रत्यक्षात माती वाहतूक करताना शासनाला रॉयल्टी भरावी लागते. परंतु रॉयल्टी लागू नये म्हणून संबंधित अवैध गौण खनिज वाहतूक करणारे मात्र महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक, दिशाभूल, फसवणूक करून मातीऐवजी गाळ वाहतूक करीत असल्याचा कांगावा करतात. अनेक बेकायदा गौण खनिज वाहतूक करणारे आपला व्यवसायिक आर्थिक हेतू साध्य करून दिवसरात्र सुसाट वेगाने वाहने चालवित आहे. डंपरमधून माती वाहतूक होत असताना इतर दुचाकी, चार चाकी वाहनधारकांना नागरिकांना पायदळ चालणाऱ्यांना उडणाऱ्या मातीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    जागा मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाईची मागणी

    माती वाहतूक करणारे वाहनधारक त्या मातीवर फट, ताडपत्री का टाकत नसल्याने आणि ती माती सर्वत्र उडत असल्याने रस्त्यावर पडत असल्याने याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. असे का? होत आहे, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. त्यात राजकारणाशी संबंधित राजकीय प्रभावामुळे मनमानी करीत आहे. शासनाच्या तिजोरीला कोट्यावधी रुपयांचा चुना लावला जात आहे. त्यामुळे यावलच्या तहसिलदारांनी आपल्या महसूल पथकाच्या माध्यमातून पिवळी माती वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर वाहनांची तपासणी करून त्या वाहनात गाळ आहे की पिवळी माती आहे? गाळ वाहतूक कुठून कुठे? आणि कोणत्या ठिकाणी होत आहे. गाळ वाहतूक परवानगी कोणत्या धरणातून मिळाली आहे. गाळ वाहतूक संदर्भात वाहतूक करणाऱ्याने ऑनलाइन बुकिंग किंवा परवानगी घेतलेली आहे का? त्याची चौकशी व खात्री करून अवैध गौण खनिज धारकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच प्रत्यक्ष जागांसह स्थळांचे पंचनामे करून संबंधित जागा मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, अशीही सर्व स्तरातून मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.