Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»खडकदेवळा हायस्कुलच्या स्नेहसंमेलनात विविध कलागुणांची उधळण
    पाचोरा

    खडकदेवळा हायस्कुलच्या स्नेहसंमेलनात विविध कलागुणांची उधळण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांकडून विविध कलागुणांची उधळण करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांनी दाद दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धैर्यशीलराजे पवार, संस्थेच्या सचिव श्रीमती रूपाली जाधव, विश्‍वस्त विश्‍वजीत पवार, विश्‍वस्त प्रमोद गरूड, मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे यांच्यासह पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विश्‍वासराव पवार ट्रस्टचे आद्य संस्थापक स्व. श्रीमंत आबासाहेब के.एस.पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

    यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करत सामूहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य, नाटिका, एकपात्री प्रयोग आणि गीत गायन असे विविध अंगी कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती कुंदा पाटील, स्वप्नील पाटील, सी. बी. पाटील, श्रीमती एस. बी.राजपूत, विकी बागुल, सागर परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.

    यावेळी प्रशालेचे उपशिक्षक निवृत्ती बाविस्कर यांनी किशोर कुमार यांनी गायलेले एक सुंदर गीत सादर केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, आर. डी. सूर्यवंशी, एम. जे. पाटील, एन.एन.पाटील, किशोर देशमुख, सुभाष देसले, शरद साळुंखे, अनिल घोडेस्वार, ईश्‍वर पाटील, सुनील गुजर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संस्थेचे विश्‍वस्त प्रमोद गरुड तर सुत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Jalgaon : आर आर विद्यालयात गुढीपाडवा उत्सव: मराठी नववर्षाचे स्वागत ‘स्वररंग’ कार्यक्रमाने

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.