चाळीसगावला जुगार अड्ड्यावर धाड; पाच जण ताब्यात

0
46

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे सुरू असलेल्या सार्वजनिक जागी जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य आणि दुचाकी असा १ लाख ७२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पोलीस पथकाने सोमवारी, २२ जानेवारी रोजी रात्री छापा टाकला. कारवाईत जॉनी ऊर्फ मुन्ना सुंदर काळे (वय ३८, रा. पवारवाडी, चाळीसगाव), मिर्झा ईमरान मोहसीन बेग (वय ४४, रा. पवारवाडी), अमोल दिलीप जैस्वाल (वय ४५, रा. पवारवाडी), खुशाल अनिल जैस्वाल (वय ३९, रा. स्टेशन रोड, मशिदजवळ, चाळीसगाव) आणि किरण सीताराम गवळी (वय ३२, रा. साने गुरूजी नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य आणि दुचाकी असा १ लाख ७२ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. विशाल टकले, पो.हे.कॉ. नितीन वाल्हे, पो.ना. भूषण पाटील, महेंद्र पाटील, पो.कॉ. भरत गोराळकर, राकेश महाजन, विजय पाटील यांनी केली. पुढील तपास भूषण पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here