Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»वाळू माफियांची मुजोरी वाढली ; प्रांताधिकाऱ्याचा गळा दाबत हत्येचा प्रयत्न
    एरंडोल

    वाळू माफियांची मुजोरी वाढली ; प्रांताधिकाऱ्याचा गळा दाबत हत्येचा प्रयत्न

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 13, 2024Updated:January 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली आहे. आता शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना जमिनीवर पाडून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. वाळूमाफियांनी पथकावर दगडफेकही केली. याप्रकरणी कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह १०-१२ अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्यापासून अवघ्या १७ किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्‍याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्‍वंभर शिरसाठ, पोलीस पाटील प्रदीप तिवारी, महाजन आदींचे पथक उतरले. तेथे ८ ते १० ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसून आले. पथकाला पाहताच चालकांनी ट्रॅक्टर भरधाव घेत पलायन केले. मात्र, तेथे दोन ट्रॅक्टर थांबले होते. पथकाने मुसक्या आवळताच आणखी चार-पाच जण आले. त्यांना उपविभागीय अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी गायधनी यांनी सरकारी कामात अडथळा आणू नका, असे बजावत आमचे काम करू द्या, असे सांगताच ट्रॅक्टर चालक आकाश राजेंद्र पाटील, अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्यासह १०-१२ अज्ञात मारेकऱ्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांना पकडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

    श्री.गायकवाड यांची प्रमोद गायधनी, दीपक ठोंबरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कसेबसे वाळूमाफियांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयितांनी दगडफेक केल्याने गायकवाड, गायधनी, ठोंबरे यांच्यासह कर्मचारी जखमी झाले. दगडफेकीत गायकवाड यांचा डोळा थोडक्यात बचावला. गायधनी यांच्या हाताला, कंबरेवर मुका मार लागला आहे. त्यांच्यावर एरंडोल येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. उत्राणचे मंडळ अधिकारी गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आकाश पाटील याच्यासह १०-१२ अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांनी भेट देत जखमी अधिकाऱ्यांची विचारपूस केली.

    आमच्या अंगावर बसून मारेकऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्हीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मारेकऱ्यांचे संख्याबळ अधिक असल्यामुळे आम्ही तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी केलेल्या दगडफेकीत आम्ही सर्व जखमी झालो. एरंडोल येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना घटनेची माहिती देत, पथकांना हत्यारे देण्याची मागणी केली असल्याचे प्रमोद गायधनी (जखमी मंडळ अधिकारी, उत्राण, ता. एरंडोल) यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.