साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे जळगाव येथे निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शिखर संमेलनाला आले असता पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी तथा साहित्यिक विनोद अहिरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी विनोद अहिरे यांनी संजय पांडे यांना स्वलिखित ‘ हुंकार वेदनेचा’ आणि ‘मृत्यू घराचा पहारा’ हे पुस्तके भेट दिली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्या.