जनऔषधी केंद्राच्या राज्य समन्वयकपदी प्राचार्य डॉ.भूषणकुमार साठे

0
14

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील भारत सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या जन औषधी मेडीकल स्टोअर्सचे विजय पाटील (सदस्य फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ.मोंटूकुमार पटेल यांनी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी तथा वर्धा येथील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भूषणकुमार सुरेश साठे यांची नुकतीच राज्य समन्वयकपदी निवड केली आहे.

केंद्र सरकारच्या योजनेत त्यांना संधी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे. फार्मसी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सामावून घेऊन उत्तम रोजगार व सेवेची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामार्फत गरजु रुग्णांना अल्पदरात औषध उपलब्ध करून दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here