Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. वडनगरी फाटा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून पालकमंत्र्यांनी शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

    वडनगरी फाटा येथे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्यावतीने पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित केली आहे. कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा पालकमंत्र्यांनी आयोजक संस्था व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. याप्रसंगी उद्योजक अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता गिरीष सूर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही, मंदिर समितीचे जगदीश चौधरी, सीए हितेश आगीवाल, पदाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, अशोक जैन यांच्या हस्ते मुख्य सभा मंडपाचे उभारणी कामांचे उद्घाटन करण्यात आले.

    पालकमंत्री म्हणाले की, शिव महापुराण कथेसाठी जळगाव जिल्ह्यात ६ लाख भाविक येणार आहेत. यासाठी जिल्हावासियांनी आयोजकांना सहकार्य करावे. कार्यक्रमासाठी वाहतूक नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे. सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, भोजन, आंघोळीसाठी गरम पाणी याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे. चोपडा-जळगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे, साईड पट्ट्या भरण्यात यावे. मंदीर परिसरात रबरचे स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे. पाळधी-आव्हाने रस्त्याची ही दुरूस्ती करण्यात यावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

    वीज महावितरणने याठिकाणी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसवावा. पथदिवे बसविण्यात यावे. स्वतंत्र आरोग्य पथक नेमण्यात यावे. साफसफाईची चोख व्यवस्था ठेवण्यात यावी. वाहतुकीचे चोख नियोजन करण्यात यावे. महावितरण, आरोग्य, पोलीस व बांधकाम विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवत काम करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी आयोजक समिती, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.