केळी पिक विमाधारक प्रलंबित ११ हजार ३६० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

0
16

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील ११ हजार ३६० केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा मावळल्या होत्या. याबाबत विमा कंपनीने नुकसान भरपाईबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवला असल्याने खा.उन्मेश पाटील यांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर करून शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा हप्ता शासनास जमा करु नये व लागवड केलेले क्षेत्र अंतिम ग्राह्य धरून पिक विमा नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी करून त्यास मंजूरी मिळवून घेतल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असून प्रलंबित पिक विमा मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी पिकाचा अंबिया बहार २०२२ मध्ये जिल्ह्यातील ७७ हजार ८३२ शेतकऱ्यांनी ८१४६५.११ हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाचा विमा काढला होता. याबाबत पिक विमा कंपनीने वेळेवर पिक पडताळणी न केल्याने केळी पिकाच्या लागवड क्षेत्राबाबत मोठी समस्या उद्भवली होती. याकरिता विमा कंपनीकडून सॅटॅलाईट इमेज प्राप्त करून केळी पिक लागवड केलेले क्षेत्र निश्‍चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने प्राप्त अहवालानुसार जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ शेतकऱ्यांनी ५६९१२.१२ हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या केळी पिकास ३७८ कोटी ३० लाखाची नुकसान भरपाई देण्याचे निश्‍चित केले होते.

अहवालात ११ हजार ३६० शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेले क्षेत्र कमी आहे. शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्रावर पिक विमा काढल्याचे निष्कर्ष काढण्यात आला होता. या सर्व ११ हजार ३६० शेतकऱ्यांचा विमा हप्ता (शेतकऱ्यांनी भरलेला) तो शासनास जमा करण्याबाबत विमा कंपनी प्रयत्न करत असताना खा.उन्मेश पाटील यांनी राज्याचे कृषी सचिव यांची भेट घेऊन सरसकट शेतकऱ्यांचे विमा हप्ता शासनास न जमा करण्याची मागणी लावून धरली. याकरिता आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून माहिती सादर केली. त्यांनी सादर केलेल्या माहितीनुसार राज्याचे कृषि सचिव यांनी शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता सरसकट शासनास जमा करु नये. तसेच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड केलेल्या केळीचे क्षेत्र ग्राह्य धरून त्या क्षेत्राच्या अनुषंगाने मंजुर नुकसान भरपाई देण्याचे लेखी आदेश विमा कंपनीस दिले आहे. यामुळे ११ हजार ३६० शेतकऱ्यांना केळी पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग या माध्यमातून मोकळा झाला आहे. तसेच पिक पडताळणी प्रलंबित असलेल्या १ हजार ९०२ शेतकऱ्यांपैकी १ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पात्र ५३ हजार ९५१ शेतकऱ्यापैकी ४२ हजार २४३ शेतकऱ्यांची नुकसान भरपाई विमा कंपनीने अदा केली होती. त्यानुसार खा.उन्मेश पाटील यांनी दोन दिवसापूर्वी विमा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन जाब विचारून तात्काळ दोन दिवसात नुकसान भरपाई देण्याची मुदत दिली होती. त्या अनुषंगाने प्रलंबित ११ हजार ८०० शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाईही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here