Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रामनामाच्या जयघोषात दुमदुमली जळगाव नगरी
    जळगाव

    रामनामाच्या जयघोषात दुमदुमली जळगाव नगरी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 23, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव नगरीचे ग्रामदैवत आणि वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावच्या विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथयात्रेचे गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात राम नामाच्या गजरात आयोजन केले होते. यानिमित्त पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्‍वस्त, विद्यमान पंचम गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांच्या हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्र घोषात झाले.

    याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, ना.गुलाबराव पाटील, आ.सुरेश दामू भोळे, पोलीस निरीक्षक शनी पेठ, माजी महापौर, माजी उपमहापौर, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, नंदूशेठ आडवाणी, पीपल्स बँकेचे संचालक मोराणकर, डॉ. केतकी पाटील, जैन इरिगेशनचे अशोक जैन, जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, पिपल बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, सुनील भंगाळे, विष्णू भंगाळे, चंद्रकांत गवळी, चंदन वसंतराव कोल्हे, अशोक नकाते, उल्हास पाटील, सनातन संस्थेचे पू.नंदकुमार जाधव आदी मान्यवरांचा श्रीफळ व उपरणे देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर उत्सव मूर्ती रथावर आरूढ झाल्यावर पुन्हा आरती करण्यात आली. त्यानंतर अपूर्व उत्सवात रथ ग्राम प्रदक्षिणेस मार्गस्थ झाला. मागील बाजूस रथ आल्यावर तेलंगणा राज्यातील, जिल्हा निजामाबाद, हंडे केलूर गावातील वेदमूर्ती गजानन कुलकर्णी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. खास उत्सवासाठी चातुर्मासातील कडक नियम सुरु असतानाही वेदमूर्ती जळगावी आले आहेत.

    रथ प्रस्थानाचा मार्ग श्रीराम मंदिर, भोईटेगढी, आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, दाणा बाजार, अन्नदाता हनुमान मंदिर, चैतन्य मेडिकल समोरून, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होऊन श्री मरीमाता मंदिर भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील संत आप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशहा बाबा यांची समाधी येथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवक पुष्पहार अर्पण केला. बालाजी मंदिर, रथ चौकात रथ रात्री बारा वाजेपर्यंत परत आला. रामांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात आल्या. तेथे प्रभू श्रीराम चंद्रांची शेजारती करण्यात आली. रथाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून अखंड असंख्य भाविकांच्या झुंडीच्या झुंडी प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगाव या भावाने दर्शनासाठी येत होत्या. वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री राम मंदिरांचे मूळ सत्पुरुष संत अप्पा महाराज यांनी हिंदू समाजातील अठरापगड जाती एकत्र करून हा रथोत्सव सोळा प्रारंभ केला. आज गेले १५० वर्षे झाली जळगावकरांच्या असंख्य भाविक नागरिकांच्या सहकाऱ्यांनी रथोत्सवाचा नंदादीप अखंडपणे तेवत आहे.

    रथोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्‍वस्त विद्यमान गादीपती हरिभक्ती परायण गुरुवर्य श्री मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थांचे विश्‍वस्त मंडळी भरत अमळकर, भालचंद्र पाटील, दादा नेवे, सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, विवेक पुंडे व रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, दिलीप कुलकर्णी, सदस्य भानुदास चौधरी, विलास चौधरी, संजय चौधरी, सुजित पाटील, पितांबर चौधरी, राजेंद्र काळे, दिगंबर खडके, मुकुंदा पाटील, अरुण मराठे, दिलीप खडके, देवेश पाठक, उदय पाठक, देविदास बारी, मुकुंद धर्माधिकारी, नंदू शुक्ल, महेंद्र जोशी, प्रणव जोशी, विकास शुक्ल, बापू शुक्ल, सुनील शिंपी, सदाशिव तांबट, गणेश दायमा, जितेंद्र वाळके, राजेंद्र जोशी, रमाकांत जोशी, पराग जोशी ,विनायक जोशी, उदय बुवा, तानाजी बारी, केशव बारी, शंकर चौधरी, घनःश्‍याम चौधरी, दिलीप राजपूत, मधुकर चौधरी, योगेश कासार, संजय कोरके, सुनील पाटील, यशवंत खडके, दिनेश धांडे, गजानन फडणीस, राजू कोळी व समस्त श्रीमान भक्त मानकरी सेवेकरी मंडळींनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.