Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राष्ट्रीय उद्योजक्ता दिनानिमित्त ” फिफ्टी का फंडा ” स्पर्धा उत्साहात
    जळगाव

    राष्ट्रीय उद्योजक्ता दिनानिमित्त ” फिफ्टी का फंडा ” स्पर्धा उत्साहात

    SaimatBy SaimatNovember 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    राष्ट्रीय उद्योजक्ता दिना निमित्त के. सी. ई. सोसायटीचे इन्सिस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, जळगाव मध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन बिझिनेस आयडिया विषयी रिसर्च , इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी ला चालना मिळावी या उद्देशाने ” फिफ्टी का फंडा ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

    याप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना राम बायोटेक चे एम. डी. पुष्कराज चौधरी यांनी सांगितले कि, ” बिझिनेस करताना अत्यंत महत्वाचे आहे ते इंटिग्रिटी म्हणजे अखंडता पाळणं. त्याच बरोबर उद्योजक म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागते हे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कंपनी राम बायोटेक चा आता पर्यंतचा प्रवास उलगडला. उद्योजक म्हणून शिक्षणा बरोबरच लिसनिंग पॉवर, इमॅजिनेशन, व्हिजुअलाझेशन ची पॉवर, क्रिटिकल थिंकिंग सह एकाग्रतेसाठी ध्यान हे किती महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना उदाहरण देत स्पष्ट केले . तसेच उद्योजक म्हणून आपण आपल्या बिझनेस चे कर्मचारी , ग्राहक, बिझिनेस ची व्याप्ती या बद्दल कृतज्ञता दाखवून कसे धन्यभागी राहावे असे सांगितले.”
    स्पर्धेमध्ये बिझिनेस प्लॅन आयडिया प्रेझेन्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध नवीन बिझिनेस आयडिया प्रेझेंट केल्या ज्यात गिफ्ट एक्सप्रेस, मेडिकल हेल्थ केयर द्रोण, अलम सोप, नटहस्क बार, सिनियर सिटीझन पासून ते वोर्किंग वुमन ला घरपोच ग्रोसरी पाठवण्यासाठी फ्रेंडली ग्रोसरी , इको राइड्स, स्टार्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स, LED लाईट मॅनुफॅक्चरिंग , ज्युसी कॉस्मेटिक, पी.डी .स्किन्स, सोलर वर चालणारे वेहिकल, फूडकलर व फुलांपासून ऑरगॅनिक इंक अश्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस देणाऱ्या, अप्लिकेशन वेबसाईट , इ-कॉमर्स, ऑनलाईन बिझिनेस असे अनेक नवनविन इनोव्हेस्टिव्ह आयडिया एकूण पंचेचाळीस टीमव्दारा दोनशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
    या कार्यक्रमाची संकल्पना प्रा. जयश्री चौधरी यांनी मांडली. प्रास्ताविक प्रसंगी डॉ. पराग नारखेडे यांनी “स्पर्धेमागचे उद्दिष्ट व बिझिनेस करताना उदयोजकला लागणारे स्किल शिक्षण घेताना कशे आत्मसात करावे या बद्दल माहिती दिली.” इन्सिट्यूट च्या संचालक डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थांना आजच्या स्पर्धेच्या युगात स्मार्ट वर्क सोबत हार्ड वर्क करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच ज्या विद्यार्थांना उद्योजक या क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करावायचे आहे, अश्या विद्यार्थांनी या स्पर्धामध्ये उत्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आव्हान केले.
    या प्रसंगी इन्सिट्यूट च्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे ,अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. तनुजा फेगडे, एम.बी.ए. समन्वयक डॉ. पराग नारखेडे, एम.बी.ए. विभागप्रमुख प्रा. डॉ. ममता दहाड, कार्यक्रम समन्वयक प्रा. जयश्री चौधरी, प्रमुख पाहुणे तसेच परीक्षक म्हणून राम बायोटेक चे एम. डी. पुष्कराज चौधरी, रवी प्लास्टिक चे संस्थापक सागर फालक उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव चतुरभूज आणि मानसी जगताप यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन मानसी जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon:ऑनलाईन फसवणूक: शेतकऱ्याचे बँक खाते हॅक, ५.५ लाख रुपयांची लंपास

    March 18, 2026

    Bhusawal:खडका चौक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

    March 18, 2026

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.