शाहूनगरातून तरूण बेपत्ता

0
14

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील शाहूनगर येथे राहणारा तरुण गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पवन ज्ञानेश्वर विसपुते (वय-२५, रा. शाहूनगर जळगाव) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पवन विसपुते हा आपल्या परिवारासह जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात वास्तव्याला आहे. गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी पवन हा घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. रात्रीपर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याची कुठेही माहिती मिळाली नाही, म्हणून अखेर शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ बालाजी बारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here