Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा
    कृषी

    पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    पाचोरा, भडगाव तालुक्यातर्फे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शासनातर्फे लवकरात लवकर दुष्काळग्रस्ताच्या यादीत दोन्ही तालुके समाविष्ट न केल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी वजा आवाहन माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या रॅलीने पाचोरा शहराचे लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणांनी पाचोरा शहर दणाणून गेले होते. दोन्ही तालुके दुष्काळ जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी जोरजोराने बोलून दाखवित होते.

    यापूर्वीही दोन महिन्यांपूर्वी पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. पावसाळ्यात पाऊस उशिरा सुरू झाला होता. पाऊस समाधानकारक नव्हता. शिवाय पाऊस वेळेवर न पडल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे शेतीपासून उत्पादन मिळालेले नाही. किंबहुना बऱ्याच ठिकाणी पेरणी व इतर उपाययोजना केलेला खर्च अद्यापपर्यंत आलेला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे, जिल्ह्यातील तीन मंत्री सत्तेत असताना राजकीय नेत्यांच्या अभावामुळे शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आपल्या तालुक्यांचा समावेश केलेला नाही. निवेदनावर पाचोरा, भडगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. आर्थिक आणेवारी, दुष्काळाची तीव्रता, पिक विमा योजना, समाधानकारक नुकसानभरपाई मिळावी, आदी ज्वलंत प्रश्‍न व पाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद केले आहे.

    निवेदन देतेवेळी पी.टी.सी.चे चेअरमन संजय वाघ, सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख, नितीन तावडे, विकास पाटील, रणजीत पाटील, अझहर खान, राहुल पाटील, हर्षल पाटील, कुणाल पाटील, भूषण सोनवणे, नीमन दादा, संजय परदेशी, मोठाभाऊ पाटील, सुदर्शन सोनवणे, शालीग्राम मालकर, ललित वाघ, भूषण वाघ, विजू पाटील, व्ही.एस.पाटील, शशिकांत वाघ, वासुदेव माळी, अशोक मोरे, डी.डी.पाटील, एन.सी.पाटील, प्रकाश पाटील, बी.एम.पाटील, दीपक पाटील, योगेश पाटील, ए.जे.महाजन, ए.बी.अहिरे, अविनाश सुतार, विनोद पाटील, रघुनाथ पाटील, रवी झवर, सतीश चौधरी, भगवान मिस्तरी, शिवाजी पाटील, भैय्या पाटील, दिगंबर पाटील, अनिल पाटील, किशोर पाटील, आबा पाटील, महेंद्र पाटील, सुरेश पाटील, सत्तारभाई पिंजारी, सय्यदभाई तारीख, सुनील पाटील, जमील तडवी, हिरामण काळे, शिवदास पाटील, कोळी सर, अशोक पाटील, प्रदीप पाटील, संतोष कुटे, सागर अहिरे, हमीद शाह, हारून देशमुख, सचिन पाटील, रवींद्र पाटील, बुरहान तडवी, अनिल वाघ, धर्मा आण्णा, बारकु दादा, श्‍याम परदेशी, प्रकाश भोसले, राजेंद्र पाटील, संतोष पाटील, सतीश देशमुख, बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील, अशोक पाटील, सुनील पाटील, प्रकाश निकुंभ, गुलाब तडवी, जय सुतार, निलेश पाटील, हरीश पाटील, गौरव शिरसाठ आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.