Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावात २७ ऑक्टोबर पासून राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन
    जळगाव

    जळगावात २७ ऑक्टोबर पासून राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन

    SaimatBy SaimatOctober 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशन तर्फे ३९व्या राज्य वार्षिक परिषदेचे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस गांधीतीर्थ येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयोजन चेअरमन डॉ. सुनील नाहाटा, सेक्रेटरी डॉ. हर्षवर्धन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    आयएमएच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत संचालक डॉ. अनिल खडके, जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भूषण झवर, को- चेअरमन डॉ. जितेंद्र कोल्हे, सायंटिफिक चेअरमन डॉ. विनोद जैन, ज्येष्ठ सर्जन डॉ.प्रकाश कोचर, डॉ.मिलिंद कोल्हे आदिंची उपस्थिती होती.

    सुमारे ३२ वर्षानंतर जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनला राज्य वार्षिक परिषदेच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे. परिषदेत राज्याबाहेरील नऊ तज्ञ मार्गदर्शकांसह राज्यातील ५००अस्थिरोग तज्ञांचा सहभाग असणार आहे. शुक्रवार २७ रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ डॉ. जी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते व असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. राजेंद्र अभ्यंकर, सचिव डॉ. नारायण करणे, डॉ. सुनील नाहाटा, डॉ. हर्षवर्धन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. परिषदेसाठी स्व. डॉ.अनिल आचार्य, डॉ. प्रताप जाधव, डॉ.घनश्याम कोचुरे यांचे नाव तीन सभागृहांना देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत सीएमई आणि पीजीकॉनचे आयोजन करण्यात आले आहे. २८ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आणि २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत चर्चासत्र, व्याख्याने, पेपर प्रेझेंटेशन, वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.

    महिला अस्थिरोग तज्ञांसाठी स्वतंत्रपणे एका सत्राचे आयोजन केले असून त्याचे संचालन देखील महिला अस्थिरोग तज्ञ करणार आहेत. तर रविवार २९ रोजी परिषदेचा समारोप होणार आहे. यावेळी डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ.संजय पाटील, डॉ.नितीन धांडे, डॉ.अनुप पाटील, डॉ हर्षिता नाहाटा, डॉ.दीपक अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते आदी अस्थिरोग तज्ञांची उपस्थिती होती.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.