Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»कासोदा सरपंचपदी पुरुषोत्तम उर्फ बंटी चौधरी
    एरंडोल

    कासोदा सरपंचपदी पुरुषोत्तम उर्फ बंटी चौधरी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर

    येथील सरपंच महेश पांडे यांनी दिलेला शब्द पाळून अडीच वर्षात आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी, २० ऑक्टोबर रोजी सरपंच निवडीवेळी सरपंच पदासाठी पुरुषोत्तम उर्फ बंटी चौधरी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक अध्यक्ष अधिकारी शिवाजीराव गुडगुडे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री.चव्हाण यांनी बंटी चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यापूर्वी अरशद अली यांचीही उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर सरपंच बंटी चौधरी आणि उपसरपंच अरशद अली यांचे कासोदा ग्रामपंचायतमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रा.पं.चे सर्व १७ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच निवडीनंतर ग्रामपंचायतीपासून ते संपूर्ण गावात त्यांची ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली.

    सरपंच बंटी चौधरी यांना राजकारणाचा वसा त्यांचे वडील भास्कर चौधरी यांच्याकडून मिळाला आहे. उपसरपंच अरशद अली यांना त्यांचे वडील स्व. मुख्तार अली यांच्याकडून वसा मिळाला आहे. निवडीप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी सरपंच महेश पांडे, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, भास्कर चौधरी, ग्रामविकास अधिकारी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बांधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कासोदा पोलीस स्टेशनकडून चोख पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Erandol:एरंडोल तालुक्यात हनुमंत खेडेत लग्नसमारंभात हाणामारी

    February 25, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Erandole : एरंडोल जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.