साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन इंडिया यात्री कल्याण, रेल्वे प्रवासी, बस प्रवासी पैदल प्रवासी, छोटे वाहन प्रवासी यांच्या हित आणि हक्कासाठी पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन इंडिया यात्री कल्याण संघाची स्थापना केली आहे. त्यात पत्रकार तथा आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश प्रभारी प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत कदम (चाळीसगाव, जि.जळगाव) यांची यात्री कल्याण संघ भारतच्या पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अलोकनाथ तिवारी (गुजरात) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतिश परदेशी (मनमाड) यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत कदम यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.