अमरावती विभागीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा उत्साहात

0
33

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्‌स असोसिएशन बुलढाणा अंतर्गत अमरावती विभागीय शालेय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मलकापूर, जि.बुलढाणा येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन रामभाऊ झांबरे, लक्ष्मीशंकर यादव, तालुका क्रीडा अधिकारी विजय पळसकर, बुलढाणा सॉफ्ट टेनिस स्पोर्टस असोसिएशनचे सचिव राजेश्वर खंगार, चंद्रकांत साळुंके, दिनेश राठोड, राजदीप मनावर, ज्ञानेश ताले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

स्पर्धेत अमरावती विभागातील तब्बल ११५ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यात ७८ मुलांनी तर ३७ मुलींनी विजेते पदासाठी झुंज दिली. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वासीम, अमरावती मनपा, अकोला मनपा तसेच बुलडाणा येथील खेळाडूंनी सहभाग घेतला. यामधूनच ३० खेळाडूंची सातारा येथील राज्य स्पर्धेसाठी अमरावती विभागीय संघात निवड झाली आहे.

स्पर्धेचे अंतिम निकालपत्रक असे

१४ वर्षाच्या मुलांच्या वयोगटात प्रथम स्पर्श तायडे, द्वितीय युवराज खेदड, तृतीय प्रतिक इंगळे, योगेश जत तर मुलींच्या गटात प्रथम भक्ती क्षीरसागर, द्वितीय पलक परदेशी, तृतीय आर्या वानखेडे, आदिती मोरे, १७ वर्षाच्या मुलांच्या वयोगटात प्रथम तनिस तायडे, द्वितीय सार्थक जोगदंड, तृतीय मंथन कदम, आदित्य पांडे, मुलींच्या गटात प्रथम विनिता खेडद, द्वितीय सोनल खर्चे, तृतीय देवश्री जगताप, सृष्टी नरोटे, १९ वर्षाच्या मुलांच्या वयोगटात प्रथम लोकेश चांडक, द्वितीय प्रणव रत्नपारखी, तृतीय कुणाल पळसकर, सौरभ दिवाने, मुलींच्या गटात प्रथम सृष्टी होले, द्वितीय भक्ती साळुंके, तृतीय श्रावणी जोगदंड, विधी वर्मा यांचा समावेश आहे. सर्व विजेते खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत जे खेळाडु विजेते झाले आहेत. त्यांना अमरावती विभागीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धा पुढील महिन्यात सातारा येथे होणार आहेत.

यांनी बजावली भूमिका

विजेते खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष बोरगावकर, कार्याध्यक्ष राजेश महाजन यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत पंच म्हणून अमोल तायडे, आशितोष दुबे, प्रसाद सांबरे, ज्ञानने कदम यांनी काम पाहिले. तांत्रिक कमिटी प्रफुल्ल वानखेडे, राजदीप मनावर, ज्ञानेश ताले, गणेश खर्चे, संदीप क्षीरसागर आदींनी तांत्रिक भूमिका यशस्वीपणे पार पाडण्यात भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here