शिरसगावला बालिका दिनानिमित्त शिबिर उत्साहात

0
11

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ आणि चाळीसगाव राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. संचलित न्यु इंग्लिश स्कुल (ज्युनियर कॉलेज) शिरसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी विधी सेवा शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एन.के.वाळके होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.

शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे पी.एल.व्ही. रमेश पोतदार यांनी ‘राष्ट्रीय बालिका दिवसा’ वर आधारीत कविता सादर केली. पी.एल.व्ही. सचिनकुमार दायमा यांनी ‘राष्ट्रीय बालिका दिवस’ ह्या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले, प्रतिभाताई पाटील, श्रीमती द्रौपदी मुर्मू, कल्पना चावला, पी.टी.उषा यांच्या उदाहरणासह माहिती दिली. तसेच दिवाणी न्या.एन.के.वाळके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले. तालुका विधीसेवा समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ लिपीक डी.के.पवार, सेवक तुषार भावसार यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य वाय.आर.सोनवणे, सुत्रसंचालन शिक्षक निलेश मोरे तर ॲड. साहेबराव पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here