रस्त्याच्या दुरूस्तीचे काम मार्गी लागणार

0
12

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता दुरावस्थेत आहे. त्यामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठी अडचण येत होती. त्यामुळे नगरपालिकेला रस्त्याच्या दुरूस्तीबाबत निवेदन देण्यात आले होते. निवेदन दिल्यानंतर परिसरातील रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन नगरपालिका प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दिलेले आश्वासन कधी पूर्ण होईल ? याकडे परिसरातील नागरिक लक्ष ठेवून आहेत.

पावसाळ्यात झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता एकवीरा नगरमधील मिलिंद बोरसे, मयूर पाटील, सुशांत पाटील, शुभम पाटील, धीरज नेरपगार, अभिजीत पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाकडे दोनवेळा पाठपुरावा करून रस्त्याच्या संदर्भात निवेदनही दिले होते. मात्र, नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या काही दिवसात रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघातात वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांसह युवकांना आव्हान करत गेल्यावर्षी नागरिकांसमवेत स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली होती. संबंधित प्रकार मुख्याधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी यावर्षी एकवीरा नगरवासीयांना पंधराव्या वित्त आयोगातून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here