जी.पी.पाटील महाविद्यालयाचा जयदीप सोनवणे धावण्याच्या स्पर्धेत प्रथम

0
13

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव ता.भडगाव येथील ११वीचा विद्यार्थी जयदीप कैलास सोनवणे याने क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे तथा जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे छ.शि.महाराज, क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित १७ वर्षाच्या आतील जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथमस्थान पटकावले आहे. त्यामुळे त्याची नाशिकला होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जयदीपला कार्यवाहक रघुनाथ पाटील, आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, कैलास सोनवणे, सुरेश पहेलवान, राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. जयदीपच्या यशाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here