साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत ठेवलेली तीन लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, रोकडची पिशवी लांबविणारा चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील ओझर येथील वयोवृद्ध राजेंद्र तान्हीराम वाणी (वय ५७) यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत तीन लाख रुपये ठेवले होते. मात्र, चोरट्यांनी ते पिशवीसह लंपास केल्याची घटना शहरात घडली. त्यामुळे भामटा कुठे आढळून आल्यास त्वरित शहर पोलीस स्थानकाला संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. त्यात संदीप पाटील (पोलीस निरीक्षक, मो.९८५००८७४५६), सुहास आव्हाड (पोउपनि, मो.८८५०१२६७१८), योगेश माळी (पोउपनि, मो.७९७२००५६३९) आणि योगेश बेलदार (पो.हवा. मो.७०२०३१६३३५) यांचा समावेश आहे.