Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»दहिवदला तरुणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त नोंदविला सहभाग
    चाळीसगाव

    दहिवदला तरुणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त नोंदविला सहभाग

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ‘अनमोल नानकर फाऊंडेशन’ आणि ‘युवा मित्र मंडळ’ यांच्यावतीने दहिवदला सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शिबिरात ४० युनिट रक्त संकलित करण्यात आले.

    शिबिरात रोहित वाघ, दीपक वाघ, सचिन वाघ, कुलदीप वाघ, वीरेश बागुल, निखिल निकम, सुनील महाजन, गोविंदा निकम, भूषण वाघ, सागर सोनवणे, नीलेश वाघ, लतीफ पिंजारी, दीपक ठाकरे, जितेंद्र वाघ, तुषार पवार, भूषण पाटील, गणेश देवरे, प्रसाद भोसले, ज्ञानेश्वर वाघ, महेंद्र वाघ, धनंजय देवरे, दत्तु वाघ, संदीप शिंदे, रवींद्र कोळी, लखन वाघ, अनिल वाघ, सुनील वाघ, सोपान चव्हाण, प्रशांत वाघ, रावसाहेब निकम, आरिफ शब्बीर खाटीक, देविदास वाघ, प्रदीप वाघ, कल्पेश निकम, ज्ञानेश्वर नानकर, आदित्य निकम, गणेश वाघ आदी युवकांनी रक्तदान करून सामाजिक चळवळीबाबत तरुणाई जागृत असल्याचे दाखवून दिले. आयोजक अनमोल नानकर यांच्या रक्तदानाने शिबिराची सांगता झाली. यशस्वीतेसाठी जीवन सुरभी ब्लड बँकेचे संचालक डॉ. दत्ता भदाणे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. आसिफ शेख, अशपाक पिंजारी, बशीर पिंजारी, किशोर वाघ, किरण निकम, प्रदीप चौधरी, व्ही. गिरी, गुलाब वाघ, योगेश खलाणे, यज्ञेश वाघ आदींनी परिश्रम घेतले.

    भेटवस्तू देऊन रक्तदाता सन्मानित

    ५० वर्षीय महेंद्र वाघ तसेच सुनील महाजन, निखिल निकम या दिव्यांग बांधवांनीही रक्तदान करून संवेदनशील व्यक्तीमत्वाचे दर्शन घडविले. तरुण मित्रांनी स्वतःहून रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला. काही माता- भगिनींनीही रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली. हेच सामाजिक चळवळीचे यश असल्याचे रक्तदान शिबिराचे आयोजक अनमोल नानकर यांनी सांगितले. रक्तदान शिबिराचे आयोजक अनमोल नानकर फाउंडेशन, दहिवदतर्फे प्रत्येक रक्तदात्यास सन्मानित करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.