Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दरोडेखोरांकडून चव्हाण कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
    क्राईम

    दरोडेखोरांकडून चव्हाण कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

    येथे दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकून सात ते आठ दरोडेखोरांनी पाच ते सात लाखांचा ऐवज लुटून नेत ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण केली आहे. अशातच पोलीस तपास सुरू असतांनाच पुन्हा दुसऱ्या दिवशी याच दरोडेखोरांनी चव्हाण कुटूंबास जिवे ठार मारण्याची धमकी देत पोलिसांनाच आव्हान दिले आहे

    सविस्तर असे की, सोमवारी, २ च्या रात्री स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख आणि कजगाव-गोंडगाव मार्गावरील ओंकार रामदास चव्हाण यांच्या घरावर सात ते आठ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत पाच ते सात लाखांचा ऐवज लांबविला होता. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट पसरली होती. तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. त्यानंतर तपासाला गती देण्यात आली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. हे सर्व सोमवारच्या रात्रीपर्यंत चालले आणि रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान कजगाव-गोंडगाव मार्गावरील ओंकार रामदास चव्हाण यांच्या घरी पुन्हा पाच शस्रधारी दरोडेखोरांनी दरवाजा ठोकत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली. अशा प्रकाराने भयभीत झालेल्या कुटूंबातील एका सदस्याने गावातील मित्राला मोबाईल लावून ‘दरोडेखोर आले आहेत, तु मुलांना घेऊन ये’ असे सांगितले. त्यानंतर गावातून चार ते पाच तरुण मदतीसाठी धावून आले होते. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले होते.

    काही तासातच पोलिसांना आव्हान

    एकाच रात्री चक्क दोन दरोडे टाकत पाच ते सात लाखांचा ऐवज लांबवत दरोडेखोर पसार झाले होते. त्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी विविध मार्ग पोलीस प्रशासन शोधत असतांनाच पुन्हा चोवीस तासातच चव्हाण परिवारास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मोठी दहशत माजविण्याच्या प्रयत्नाबरोबरच पोलिसांनाही दरोडेखोरांनी आव्हान दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026

    Jalgaon : बळीराम पेठेत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

    April 1, 2026

    Dharangaon : कारच्या भीषण अपघातात माजी उपनगराध्यक्षांचे मुलगा जागीच ठार

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.