Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी विविध कौशल्यावर भर द्यावा
    चाळीसगाव

    विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी विविध कौशल्यावर भर द्यावा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    येथील बी. पी. आर्ट्‌स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयातील भूगोल विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त “भूगोल विषयात असणाऱ्या पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी” विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर होते. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.के.एस.खापर्डे, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, आमंत्रित प्राचार्य प्रा. सुधाकर वाघ, प्रा.ऐश्वर्या कदम, प्रा. एस. एस. गायकवाड, धनसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    रोजगाराच्या संधी शोधत असताना विद्यार्थ्यांनी सातत्य व विविध कौशल्य अंगी असणे गरजेचे असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी व्यक्त केले. भूगोल विषयात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबत व्यवसायाभिमुख शिक्षणाचा दृष्टिकोन जोपासला पाहिजे, असे मत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.के.एस.खापर्डे यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आधुनिक पर्यटनाविषयी मार्गदर्शन केले. पर्यटनाच्या संधी कशा उपलब्ध होतील, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विविध व्यवसायासाठी उपयुक्त असणारे विविध कौशल्यांचेही अध्ययन होणे महत्त्वाचे असल्याचे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे यांनी व्यक्त केले. प्रस्तुत कार्यक्रमासाठी आमंत्रित प्राचार्य प्रा. सुधाकर वाघ यांनी आपल्या व्याख्यानात भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसाय संधी तसेच पर्यटनाचे प्रकार समूह पर्यटन व आजच्या काळातील आधुनिक पर्यटन ऑनलाईन पर्यटनाच्या सुविधा त्यामधील असणाऱ्या रोजगाराच्या संधी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

    प्रास्ताविकात भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. विजय बाविस्कर यांनी प्रस्तुत कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश व विभागातर्फे वर्षभरात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाविषयी सखोल माहिती दिली. सूत्रसंचालन समन्वयक डॉ. व्ही. डी. चौधरी तर प्रा.किशोर पाटील यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.