Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गावठी कट्टा बाळगणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
    क्राईम

    गावठी कट्टा बाळगणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    तालुक्यातील पुनगाव शिवारातून एका गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. विनापरवाना शस्त्र बाळगण्याची परिसरातील आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

    सविस्तर असे की, तालुक्यातील पुनगाव येथे एकाजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची गोपनिय माहिती २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पो. कॉ. संदीप भोई, प्रकाश शिवदे यांचे पथक तयार करत घटनास्थळी रवाना केले. पथकाला पुनगाव शिवारातील महादेव मंदिराचे अलिकडे पोल्ट्री फार्मजवळ दोन इसम फिरत असल्याचे निदर्शनास येताच पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी पथकासह सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले. याप्रसंगी त्यांची झडती घेतल्यावर त्यातील राहुल अनिल परदेशी (वय २७) याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. दरम्यान पथकाने त्यांना विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनमध्ये आणले.

    पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून २० हजार रुपये किंमतीचे एक काळ्या रंगाचे त्यावर काळे हॅण्डग्रीप असलेले गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) त्यास ट्रिगर दबलेले व रिकामी तसेच विना स्प्रिंगची मॅगझिन तिची मागील पट्टी निघालेले असे शस्त्र अनाधिकृतपणे बाळगल्याने राहुल अनिल परदेशी (वय २७) आणि रामचंद्र गोपीचंद परदेशी (वय ३७, दोन्ही रा. पुनगाव ता. पाचोरा) यांच्याविरूद्ध भाग ६ गु. र. नं. ३४७ / २०२३ भारतीय हत्यार कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहे. एकीकडे या धडक कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक केले जात असतांनाच आठवडाभरातच अग्निशस्त्र बाळणाऱ्यांना जेरबंद करण्याची ही दुसरी घटना आहे. ऐन सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी बोकाळत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.