Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षकामुळे वाढली पुरस्काराची उंची – डीवायएसपी कृष्णांत पिंगळे
    भुसावळ

    दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षकामुळे वाढली पुरस्काराची उंची – डीवायएसपी कृष्णांत पिंगळे

    SaimatBy SaimatSeptember 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत भुसावळ प्रतिनिधी

    ज्ञान हाच सदाचार आणि सदाचार हेच ज्ञान असे मानून दीपस्तंभासारखे काम करणाऱ्या डॉ. जगदीश पाटील सर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाला आहे. शिक्षकांच्या जीवनात पुरस्काराचे खूप महत्त्व असते. डॉ. जगदीश पाटील सरांसारख्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षकाला राज्य पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे, असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी केले.

    भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात डॉ. जगदीश पाटील सर गुणगौरव समितीतर्फे आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात श्री. पिंगळे बोलत होते.
    समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शालता महाजन होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शारंगधर महाराज, सुरेश महाराज, लक्ष्मण महाराज, महेंद्रसिंग ठाकूर, डॉ. छाया फालक, राजेंद्र चौधरी, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. राजेंद्र भदाणे, डॉ. जतीन मेढे, प्रा. निलेश गोरे, डॉ. दिलीप ललवाणी, मुन्ना ठाकूर, राजेंद्र आवटे, ॲड. तुषार पाटील, ॲड. प्रकाश मोझे, चंद्रकांत चौधरी, रवी ढगे, शैलेंद्र ठाकरे, प्रा. दिनेश राठी, डॉ. शुभांगी राठी, प्रेम परदेशी आदिंची उपस्थिती होती.

    डीवायएसपी कृष्णांत पिंगळे म्हणाले की, चांगल्या लोकांचा सन्मान व्हायला हवा. शिक्षकांच्या सन्मानामुळे माझ्यातील शिक्षकालाही आनंद होतो. भविष्यात करायचे काम कागदावर नोट लिहून नेहमी खिशात ठेवायला हवी, असेही ते म्हणाले. सत्कारार्थी मनोगतात डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, आपण सर्वांनी मिळून केलेला गुणगौरव हा माझ्या आयुष्यातील सोनेरी पान ठरला असून ते पान मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे.
    अध्यक्षीय मनोगतात प्रा.डॉ.आशालता महाजन म्हणाल्या की, संत रामदासांचा जसा कल्याण शिष्य होता, तसा माझा शिष्य जगदीश आहे. त्याच्या सन्मानाने भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. तरीही न डगमगता आपले कार्य जोमाने सुरू ठेवून सतत प्रयत्न व अभ्यास केल्यामुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे.
    प्रास्ताविक डी. के. पाटील यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन डॉ. दिलीप ललवाणी यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद आठवले यांनी तर आभार शैलेंद्र वासकर यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळच्या मध्यवर्ती भागातील कोट्यवधींची जागा कचऱ्याच्या विळख्यात

    March 16, 2026

    Bhusawal : भुसावळ बस–रेल्वे परिसरात अवैध प्रवासी वाहतूक; सुरक्षा धोक्यात

    March 16, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.