साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी, १९ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणेशाचे जोरदार स्वागत केले. चाळीसगाव शहराचा मानाचा गणपती नेताजी पालकर चौक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची वाजत-गाजत परंपरेप्रमाणे भव्य मिरवणूक काढून विधीवत स्थापना करण्यात आली. यावेळी घाट रस्त्यावरील जामा मशीदसमोर मुस्लिम बांधवांनी फुलांची उधळण करुन गणपती बाप्पांचे स्वागत केले.
येथील नेताजी पालकर चौक गणेशोत्सव मंडळाचा मानाची गणेश मिरवणूक यंदा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. मानाचा गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी अनेक मान्यवरांंनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आ.मंगेश चव्हाण, जिल्हा बँक संचालक प्रदीप देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, पोलीस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, शाम देशमुख, राजेंद्र चौधरी, भूषण ब्राम्हणकार यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष जगदीश महाजन, उपाध्यक्ष हर्षल ब्राम्हणकर, संतोष मिस्तरी, सचिव दीपक पवार, सहसचिव अमोल गायकवाड, भैय्या सूर्यवंशी, सुमित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दुपारी २-३० वाजेच्या सुमारास मिरवणूक मशीदजवळ येताच मुस्लिम बांधवानी फुलांची उधळण करुन गणपती बाप्पांचे स्वागत केले.
पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त
यावेळी सपोनि सागर ढीकले, दीपक बिरारी, विशाल टकले, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, गोपनीय शाखाचे पंढरीनाथ पवार, भटू पाटील यांच्यासह चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि एक जळगाव येथील आरसीपी प्लाटून यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



