साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यात तब्बल १२ वर्षानंतर चाळीसगाव तालुक्यातील सर्व शासकीय विभागांची आमसभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी आ. मंगेश चव्हाण होते. नागरिकांनी आमसभा बैठकीचा आढावा फेसबुक लाईव्हवर घेतला.
यावेळी सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या वार्डातील आणि ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, वयोवृद्ध यांच्या अनेक प्रकारच्या समस्या आ.मंगेश चव्हाण यांनी जाणून घेतल्या. काही समस्या लागलीच सोडविल्या. काही जाणून घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देऊन त्या समस्या सोडविण्यासाठी सूचना केल्या. त्याचा सर्व आढावा जे नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाही, त्यांनी फेसबुकवर लाईव्ह सुरु असलेल्या आमसभेचा आढावा आपल्या मोबाईलवरून फेसबुकच्या माध्यमातून जाणून घेतला.