Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी राहत सय्यदला पतीनेच केले ठार
    क्राईम

    ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी राहत सय्यदला पतीनेच केले ठार

    saimatBy saimatSeptember 15, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गडचिरोली :

    जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याची पतीने निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सगळ्या प्रकारानंतर गडचिरोलीत खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद हिची तिच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली आहे. हा थरार मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास राहतच्या वडिलांनी उठून पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी पतीने पोलीस ठाण्यात जात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

    राहत सय्यद (३०) यांची त्यांचा पती ताहेमिम शेख (३८) याने चाकूने भोसकून हत्या केली. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन मुलांच्यासमोर ताहेमिमने चाकूने भोसकून राहतची हत्या केली. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राहत यांचे वडील नजद गुलाब सैय्यद झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नजद गुलाब सैय्यद हे कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक असून राहत ही त्यांची मुलगी होती.

    पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती ताहेमिम शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनीच लगेच ताहेमिम अटक केली आहे. आरोपी ताहेमिम शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून घरी आला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर ताहेमिम आणि राहत हे दाम्पत्य नजद गुलाब सैय्यद यांच्या घरी मजल्यावर राहात होते. दरम्यान, कोणत्या कारणामुळे राहतची हत्या झाली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026

    Jalgaon:जळगावमध्ये ३४ जप्त वाहनांचा जाहीर लिलाव १२ मार्च रोजी तहसील कार्यालयात

    March 5, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.