साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील आदर्शनगर हिरापूर रोड दि कॅप्टन अकॅडमी संचलित ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक दिनी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अभ्यासपूर्वक अध्यापन केले. आठवीत शिकणारा प्रणव चव्हाण हा शाळेच्या मुख्याध्यापकांच्या भूमिकेत तर मयूर शिंगटे हा प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत होता. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांनी चित्रकला स्पर्धा आयोजन केले होते. स्पर्धा परीक्षेचा निकाल मिसबा मुराद पटेल हिने जाहीर केला. विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांचे पुष्पगुछ देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनी चालविलेल्या शाळेचे कौतुक मुख्याध्यापिका सुनिता देवरे यांनी केले. संध्या फासे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शालिनी बोरसे, उज्ज्वला सूर्यवंशी, राजश्री चित्ते यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत आठवीतील गोकुळ गवळी, पायल धनंजय गवळी, नंदिनी दत्तू गवळी, मिसबा मुराद पटेल, गौरी सतिश वाणी, दिव्या उमेश गवळी, गायत्री गणेश गवळी, साई वाघ, ममता योगेश वाघरी, साईनाथ सिद्दापा गवळी, विद्या किशोर गवळी,गायत्री भटू गवळी, ओम गवळी, सायली देवबा गवळी, कुणाल गवळी हे नाटक भूमिकेत होते. सूत्रसंचालन गायत्री भटू गवळी हिने तर आभार सातवीच्या राजेश्वरी भोई हिने मानले.