Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आईनेच केली पोटच्या लेकीची हत्त्या
    क्राईम

    आईनेच केली पोटच्या लेकीची हत्त्या

    saimatBy saimatSeptember 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला ः

    शहरात एक मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तीन महिन्यांनंतर चिमुकलीच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    अकोल्यात आईच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आईने हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलिसही हादरले आहे. आईच आपल्या पोटच्या लेकराची मारेकरी निघाली आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्याने हत्येचा खुलासा झाला आहे.

    काय घडले नेमके?

    २ जूनला नाकाला चिमटा लावून मुलगी झोपली होती. नाकाला चिमटा तसाच लागून असल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या आईने रचला होता. मयत मुलीचे नाव किशोरी असे असून तिचे वय साडे पाच वर्ष इतके होते. किशोरीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने खोटे खोटे अश्रूदेखील ढाळले होते. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हत्येचा उलगडा झालाच. या प्रकरणात आज पोलिसांनी किशोरीची आई विजया हिला ताब्यात घेतले आहे.

    किशोरीचे वडील रवी आमले यांनीच दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी किशोरीच्या आईच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील बलोदे लेआऊट मध्ये ही घटना घडली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नापासूनच पती पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीकडे घटस्फोटाची मागणी सुद्धा केली होती. मात्र आई वडिलांच्या या वादाची बळी किशोरी ठरली आहे.

    किशोरीच्या वडिलांनी यासंदर्भात आधीच पोलिसांना सावध केले होते. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीचे पोस्टमार्टम केले आणि तब्बल तीन महिन्यानंतर तपासात अनेक नवे खुलासे समोर आले आहेत. नाकाला चिमटा लावल्याने किशोरीचा मृत्यू झाल्याचा देखावा रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा सुद्धा स्पष्टपणे अधोरेखित झाल्याचे चित्र आहे. पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणात किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यात घेतलं आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.