Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»शेतकऱ्यांचा भारनियमनप्रश्नी अभियंत्यास घेराव
    धुळे

    शेतकऱ्यांचा भारनियमनप्रश्नी अभियंत्यास घेराव

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धुळे : प्रतिनिधी

    भारनियमनप्रश्नी शेतकऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी दोन तास वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना सोमवारी घेराव घातला. दुहेरी भारनियमनाची जाचक अट शिथील करण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तीन मागण्या तत्काळ मंजूर झाल्या. उर्वरित मागण्यांबाबत शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. दोन आठवड्यांआत सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक गंगाधर माळी यांनी दिला.

    यावेळी शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, श्री. माळी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, बाबाजी पाटील, आनंदा बडगुजर, राजेंद्र माळी, प्रभाकर चौधरी, विलास चौधरी, संतोष खैरनार, गजानन आधार, मोहन सूर्यवंशी, दिलीप माळी, महेंद्र खैरनार, अशोक महाले, संजय माळी, दीपक बडगुजर, रोहिदास माळी, अनिल पाटील, चंद्रशेखर पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

    मर्जीप्रमाणे दुहेरी भारनियमनाची अट

    शेतकऱ्यांबाबत एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्री, अशी भारनियमनाची जाचक अट आहे. राज्य शासनाने बारा तासांच्या भारनियमनाव्यतिरिक्त मर्जीप्रमाणे दुहेरी भारनियमनाची अट लादली आहे. दुष्काळीस्थितीत थकीत बिले वसुलीसाठी वीज कंपनी तगादा लावत आहे. यासंदर्भात घेरावकर्त्यांनी केलेल्या मागण्यांप्रमाणे डिसेंबर २०२३ पर्यंत वीज महावितरण कंपनी शेतकऱ्यांकडून थकीत बिले वसुलीसाठी तगादा लावणार नाही. शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी व शेतमजूरांना सिंगल फेज लाईन उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती पावले तत्काळ उचलली जातील. शेतातील डीपी अथवा वीज वितरणाच्या लाईन नादुरुस्त असतील तर ते दुरूस्तीसाठी कंपनीकडून वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले जाईल. पथकातील समन्वयक २४ तास संपर्कात राहील, असे ठरले. शेतकऱ्यांसाठी किमान दिवसा दहा तास वीज उपलब्धतेसाठी प्रस्ताव पाठविला जाईल , अशी हमी अधीक्षक अभियंत्यांनी आंदोलकांसमोर दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.