घरफोडीसह मंदिराची दानपेटी लांबविणारा सराईत चोरटा ताब्यात

0
27

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरात घरफोडी व शनीमदिराची दानपेटी लांबविणारा संशयित आरोपी युवराज साळुंखे (रा. संजय गांधी नगर, चाळीसगाव) याला चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आतापर्यंत वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहेत. त्याने मंदिराची दानपेटी आणि घरफोडीची कबुली दिली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयितावर हद्दपारीची कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील रिंकेश हरीनाम पवानी (रा. सिंधी कॉलनी,चाळीसगाव) यांचे बंद घर फोडून २० हजाराचा मोबाईल लांबविला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी जामिनावर सुटून आलेला सराईत चोरटा युवराज साळुंखे हा शहरात संशयास्पद फिरत असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पो.हे.कॉ. योगेश बेलदार व पो.ना.दीपक पाटील यांना मिळाली. त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहे. त्यानुसार रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी रेल्वे स्टेशन रेल्वे प्लॅटफार्म येथून अटक केली. त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. शिवाय त्याने शनी मंदिराचीही दानपेटी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पो.हे.कॉ. योगेश बेलदार, पो.ना. दीपक पाटील, पो.कॉ. निलेश पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, नंदकिशोर महाजन, गणेश कुवर, मोहन सूर्यवंशी, शरद पाटील, प्रवीण जाधव यांनी केली. तपास पो.ना. दीपक पाटील, पो.कॉ. अमोल भोसले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here