अमोल महाजन यांना राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार जाहीर

0
33

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गोविंदा महाजन यांच्या सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील विविध योजनांच्या प्रभावीपणे उल्लेखनीय कार्याची दखल घेवून जळगाव येथील राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना येत्या १७ सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस जळगाव येथ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अमोल महाजन यांनी सी.एस.सी. सेंटरच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पॉक्रा तसेच महाडीबिटीच्या ठिबक सिंचन, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, शेतकरी सन्मान योजना, एम.आर. इ.जी.पी.एस., एस.बी.एम योजना तसेच राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून तळागळातील सामान्य शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अनुदान मिळवून देण्याचे प्रभावी कार्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here